लेख क्र. ३ मी ही एक मुलगा आहे.
मुलगा जन्माला आला तस त्याच्या वर जवाबदारी आस का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल...
पण तुम्ही जर नीट विचार पुर्वक बघितल असेल तर तुम्हाला समजेल की...एखाद्या घरात मुलगा
जन्माला आला तर सर्व काय म्हणता? की चला आता तुमच्या घरात मुलगा आला. आता तुमची घराला आधार देणारा आला. हो
पण त्यांना आधार देण्या साठीच जन्म देतात. पण नीट निरखून बघितल तर तुम्हाला कळेल, की हीच एक सर्वात मोठी
जवाबदारी आहे. हे सर्व जन्माला आल्या पासून सुरु होते, तर आयुष्य भर हेच चालते. आधी एक बाळ, मग एक मुलगा,
नंतर एक माणूस, आणि शेवट रुध या सर्व वयात एक मुलगा प्रत्येक टप्यात नव-नवीन जवादारी पार पडत असतो. प्रत्येक
टप्प्यात त्याच्या समोर दुःखाची मोठी-मोठी डोंगरे उभी राहतात. प्रत्येक टप्यात तो मोठी-मोठी दुःखाची डोंगर
पार करत करत त्याच्या जीवनात तो अनेक सुखणा मुकतो.
मुलगा आयुष्यातील सर्व दुःख मानत ठेवून जगात असतो. कधी घरचांचे, कधी स्वतःचे, कधी
मानसिक संताप कधी काय तर कधी काय? सर्व अडचणीतून वाट काढत तो हळू-हळू पुढे जात असतो. वाट काढतांना त्याला
अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या ना कोणाला सांगता येता ना कुणाला ऐकून घ्ययला वेळ असतो.
प्रत्येक मुलगा हा त्याच्या आयुष्यातील दुःख मनातच ठेवतो. जेव्हा मुलांना
प्रेमात/विश्वासात धोका मिळतो, म्हणजे असं नाही की फक्त मुलींना प्रेमात/विश्वासात धोका मिळतो. मुलांना पण
मिळतो. जेव्हा ते खरं प्रेम करून किंवा एखाद्यावर संपूर्ण विश्वास ठेऊन जेव्हा त्याला तडा जातो, त्या ठिकाणी
कोणी असो मग मुलगा असो वा मुलगी संपूर्ण खचून जातात. आणि मुलांच्या बापतीतली एक महत्त्वाची गोष्ट आहे,
जेव्हा त्यांचा विश्वास एखाद्या वेक्ती वरून एकदा उडाला तर त्यांचा त्या वेक्ती वर आयुष्य भर परत विश्वास
ठेवू शकत नाही. त्या वेक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्या मुलाच्या आयुष्यात परत ती जागा नाही मिळवता येत.
आणि जर कधी त्या मुलांना त्या वेक्तीला माफ जरी केलं, तरी ती वेक्ति आधी ज्या जागेवर होती ना, ती जागा परत
कधी नाही मिळत त्या मुलाच्या जीवनात.
मुलांचं आयुष दिसत तितकं सोपं नसत. मुलींना वाटत की मुलांचं आयुष खूप छान, खूप बिंदास
आहे. पण एका मुलाच्या आयुष्यात काय चाललंय हे फक्त त्यालाच माहीत असतं. सर्व म्हणतात की त्याचं आयुष खूप
चांगलं आहे, पण तोच म्हणत असतो की हे आयुष्य का अस आहे.
मुलाचं एक वैशिष्ट्य आहे, की की ते सहजा सहजी कोणासाठीच रडत
नसता. पण हे सर्वात मोठं सत्य हे ही आहे, की फक्त आई- वडिलांना साठी, बहिणी साठी, आणि त्यांच्या आयुष्यातील
खूप खास/विशेष (special) वेकती साठी ते रडतात. आणि हे सोडून ते कोणा साठीच नाही रडत. आणि रडतील का ओ जर ह्या
वेक्ती सोडल्याच तर यांच्या पेक्षा जास्त प्रेम यांना कोणीच करत नाही.
आपण कुठे तरी पडलो किंवा कुठे तरी खरचटले तर आपल्या तोंडातून ‘आई’ हा शब्द
येतो, पण त्याच ठिकाणी एखाद्या गाडीने जोरात ब्रेक दाबला तर आपल्या तोंडातून ‘बापरे’ हा शब्द येतो, अस का
याचा विचार केला आहे. कारण छोट्या-छोट्या संकटाना आई चालते, ओ पण मोठी-मोठी वादळे पेलताना बापच लागतो.
सांगण्यासाठी खूप काही आहे. आणि मुलाच आयुष्य हे असं आहे की ते जितकं समजल
तितकं कमीच आहे.
मुलाच आयुष हे अघटीत(unexploreble) आहे.